फोंडाघाट विभागाचा जि. प. सदस्य राजन चिकेनी घेतला आढावा
ट्री कटिंगसह अन्य दक्षता घेण्याच्या केल्या सूचना
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील विजवीतरण ची सर्व प्रलंबित कामे पावसाळ्याआधी पूर्ण करावीत. वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी मान्सूनपूर्व ट्री कटिंग तसेच अन्य दक्षता घ्या अश्या सूचना जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांनी महावितरण चे सहाय्यक अभियंता मनिष सावंत याना केल्या. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील फोंडाघाट, लोरे, घोणसरी,पियाळी नवीन कुर्ली वसाहत आदी गावांत पावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित आणि सुरळीत सुरु राहावा या अनुषंगाने जि प सदस्य राजन चिके यांनी महावितरण फोंडाघाट शाखा अभियंता कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी सहाय्यक अभियंता मनीष सावंत, अजित बाणे, ऑफिस कर्मचारी भोगटे मॅडम, वाघेरी माजी सरपंच संतोष राणे, फोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य मिलिंद लाड ,अमित चव्हाण ग्रामस्थ भाई तेली, संतोष रेडकर, अवसरे मॅडम, दळवी मॅडम गुरूले, संतोष लाड, चंद्रकांत घाडगे, विठ्ठल गुरव, सुरेश पारकर, बाबा माडेश्वर आदी उपस्थित होते. जि. प. सदस्य राजन चिके यांनी फोंडाघाट विभागात सध्या असलेल्या विजवीतरण बाबतच्या समस्यांचा पाढा वाचला. ग्राहकांना कमी दाबाने होणारा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या सूचनाही केल्या. फोंडाघाट गावातील हवेलीनगर, गांगोवाडी, धनगरवाडी येथे नव्याने ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. गंजलेले विद्युत पोल पावसात कोलमडून पडतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतोच, त्यासोबत अपघाताचीही शक्यता असते. हे टाळण्यासाठी गंजलेल्या विद्युत पोलांच्या जागी नवीन पोल बसवावे. विभागातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्युत लाईनवरील सर्व ट्री कटिंग वेळेत पूर्ण करावे. ऐन पावसाळ्यात वीजपुरवठा सुस्थितीत ठेवण्यासाठी विजवीतरण कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे असेही राजन चिके यांनी चर्चेदरम्यान सांगितले.












