सत्य शोधण्याचा एक जिवंत प्रवास…
मन ढवळून काढणारा नाट्यप्रयोग आचरेकर प्रतिष्ठान मध्ये 31 मे रोजी सायं. 7 वाजता
कणकवली (प्रतिनिधी) : आजच्या काळात प्रत्येक मोबाईलमध्ये बातम्या आहेत, पण प्रत्येक बातमी खरीच असते का? अफवा, अर्धसत्य आणि फेक नॅरेटिव्ह हळूहळू आपल्या विचारांवर राज्य करत आहेत. आपण जे ऐकतो, पाहतो आणि पुढे पाठवतो, त्याची सत्यता कधी पडताळून पाहतो का? की नकळत आपणही त्या खोट्या गोष्टींचे बळी ठरत आहोत? हे नाटक तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवेल, सजग नागरिक म्हणून जागं राहण्याची जाणीव करून देईल… कारण लोकशाही टिकते ती विचार करणाऱ्या माणसांमुळे, आंधळेपणाने विश्वास ठेवणाऱ्यांमुळे नाही. सध्याच्या टेक्नॉलॉजी मुळे आपल्यापर्यंत बातम्या खूप वेगाने येतात. पण प्रत्येक बातमी खरीच असते का? अफवा, अर्धसत्य आणि फेक नॅरेटिव्ह हळूहळू आपल्या विचारांवर राज्य करत आहेत. पण सत्य नेमकं कोणाच्या हातात आहे? सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा, अर्धसत्य बातम्या आणि फेक नॅरेटिव्ह हळूहळू समाजाच्या विचारांवर प्रभाव टाकत आहेत. अविवेकी श्रद्धा सामान्य माणसाला फेक नॅरेटिव्ह वर विश्वास ठेवायला भाग पाडते म्हणून विवेक जागरूक हवा. जात, धर्म, राजकारण, देशभक्ती, समाजकारण… प्रत्येक विषयावर मतं तयार केली जात आहेत, पण त्या मतांमागचं सत्य आपण कधी तपासतो का? की आपणही नकळत खोट्या कथानकांचे म्हणजेच फेक नॅरेटिव्ह चे बळी ठरत आहोत? भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला विचार करण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि सत्य जाणून घेण्याचा अधिकार दिला आहे. लोकशाही फक्त मत देऊन मजबूत होत नाही, तर सजग, जागरूक आणि चिकित्सक नागरिकांमुळे टिकून राहते. हे नाटक फक्त मनोरंजन नाही… तर आपल्या समाजाला पडलेला एक जिवंत प्रश्न आहे. फेक नॅरेटिव्हच्या धुरात हरवत चाललेलं सत्य आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक दरी यावर थेट भाष्य करणारा हा प्रभावी नाट्यप्रयोग आहे. प्रत्येक गोष्टीची सत्यता पडताळून पाहणं, जाब विचारणं आणि विवेक जपणं हेच खऱ्या लोकशाहीचं सामर्थ्य आहे. या… विचार करा… प्रश्न विचारा… कारण लोकशाही जिवंत राहते ते जागरूक नागरिकांमुळे! या… आणि सत्याच्या शोधात स्वतःलाच भेटा!
फेक नॅरेटिव्हचा बळी”













