वाढदिवसानिमित्त तलवार दिली भेट
कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे रोजगार, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले याना शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी महाड येथे भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मंत्री भरतशेठ गोगावले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या महाड येथील निवासस्थानी साजरा करण्यात आला. राज्यभरातून भरतशेठप्रेमींनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनीही महाड येथे त्यांच्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित राहून तलवार भेट देऊन हटके शुभेच्छा दिल्या. वाढदिवशी आग्रे यांनी भेट दिलेली तलवार मंत्री गोगावले यांनी म्यानातून बाहेर काढून अनोख्या भेटीबद्दल खुशी व्यक्त केली. यावेळी कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश गुरव, मंगेश तायशेट्ये उपस्थित होते.















