स्वामी भक्तीचा अपूर्व सोहळा! गोरेगावात ‘संकल्प २०२७’ अंतर्गत नामजप वही वितरण संपन्न

स्वामी गीते आणि पादुका दर्शनाने अवघे वातावरण भक्तीमय

नंदकुमार पेडणेकर, अजित पितळे व अशोक गुराम यांच्या पुढाकाराने पुरस्कार वितरण

आचरा (प्रतिनिधी) : ‘संकल्प २०२७’ अंतर्गत ११ कोटी, ११ लाख, ११ हजार, १११ लिखित नामजप पूर्ण करण्याचा जो विडा आपण उचलला आहे, तो केवळ एक आकडा नाही; तर ती आपल्या सर्वांची स्वामींवर असलेली अथांग श्रद्धा आहे. रोज आवर्जून वेळ काढा, नामजप लिहा. प्रत्येक अक्षरासोबत आपले मन स्वामी चरणी लीन होऊ द्या. जेव्हा आपण एकत्र येऊन हा संकल्प पूर्ण करू, तेव्हा त्याची ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येईल यात शंका नाही.हा एवढा मोठा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवल्याबद्दल स्वामींभक्त नंदकुमार पेडणेकर, दोन्ही मठ आणि ‘कोकण कट्टा’ यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी अशीच स्वामी सेवा करत राहावी असे आवाहन श्री.स्वामी समर्थ मठ चेंबूरचे मठाधीश स्वामी भक्त श्री विजय नलावडे यानी यावेळी केले.

श्री स्वामी समर्थ मठ (हडपीड देवगड)’, ‘श्री स्वामी समर्थ मठ (छोटा काश्मीर-गोरेगाव)’ आणि ‘कोकण कट्टा (विलेपार्ले)’ यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे ‘संकल्प २०२७’ अंतर्गत ११ कोटी ११ लाख ११ हजार १११ लिखित नामजप संकल्प पूर्तीसाठी नामजप वही वितरण सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला.यावेळी स्वामी गीतांचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन कार्यक्रमास स्वामी भक्तांनी गर्दी केली होती.

आधुनिक जगात आपले जीवन खडतर झाले आहे. प्रत्येक जण थोडी सुख शांती मीळण्यासाठी खडतर प्रवास करत आहे. अशा या जीवनात थोडे सूख मीळण्यासाठी आपल्या दैवताचा ‘ श्री स्वामी समर्थ’ हा नामजप करण्यास दिवसभरात दहा मिनिटे दिल्यास मानसिक समाधान मीळेल. मागील काही वर्षे मी आणी माझे सहकारी लिखीत नामजप वह्या मोफत लोकांपर्यंत पोहोचवत असून आतापर्यंत ७ सात करोड लिखीत नामजप संकल्प पूर्ण करून भक्तांस एक प्रकारे आनंद मिळण्यास प्रयत्न केला.

भक्तांना असाच आनंद मिळण्यासाठी ११ अकरा कोटी लिखीत नामजप संकल्प पूर्ण करण्यासाठीच तेरा हजार छापील नामजप वह्या वाटल्या गेल्या आहेत असे हडपिड स्वामी सामर्थ मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यावेळी म्हणाले.यावेळी मान्यवरानी मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.स्वामी समर्थ मठ चेंबूरचे मठाधीश स्वामी भक्त विजय नलावडे, श्री स्वामी समर्थ मठ भुईगांव वसई मठाधीश स्वामी भक्त संदिप म्हात्रे, अनिल देसाई,श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भुषण स्वामी रत्न पुरस्कार सन्मानित नंदकुमार तुकाराम पेडणेकर,कोकण कट्टा मुंबई संस्थापक अजित पीतळे,श्री.स्वामी समर्थ मठ छोटाकाश्मिर मुंबई संस्थापक मठाधीश अशोक गुराम,नितीन म्हापसेकर,अनंत जंगम,प्रकाश पावसकर नितीन परब,सचिन लोके,सत्यवान राऊत प्रभाकर यशवंत राणे,लवू साळुंखे, दिलीप तावडे, मोनीष पेडणेकर, नीलम नंदकुमार पेडणेकर, सुजित कदम, प्रथमेश गुराम, ब्रम्हाजी कर्ले, दिपक मालजी, मधुसूधन भडसाळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!