सावंतवाडी (प्रतिनिधी) : आज रोजी मौजे मीठमुंबरि येथे सावंतवाडी वनविभाग व विभागीय कांदळवन कक्षा अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलीश शर्मा विभागीय वनाधिकारी कांदळवन कक्ष अलिबाग कांचन पवार सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी सुनील लाड सहाय्य वनसंरक्षक कांदळवन कक्ष प्रियंका पाटील वनशेत्र पाल कणकवली सुहास पाटील वनक्षेत्रपाल कांदळवन कक्ष मालवण महादेव शिंगाडे यांचे मार्गदर्शनाखाली पर्यावरण दिनानिमित्त मौजे मीठ मुंबरी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सदरचे क्षेत्र हे ऑलिव्हरीडले कासव वांचे वीहीणक्षेत्र असल्याने सदर क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिक बॉटल व इतर कचरा न करण्याचे आव्हान वनविभागामार्फत करण्यात आले सदर स्वच्छता मोहिमेत माननीय पंचायत समिती उपसभापती अमोल लोके परिमंडळ वनाधिकारी देवगड श्रीकृष्ण परीट सरपंच मीठ मुंबरी बाळकृष्ण गावकर ग्रामस्थ लक्ष्मण तारी रमेश तारी तसेच मीठ मुंबरी ग्रामस्थ कासव मित्र कांदळवन असोसिएट कणकवली वनपरिक्षेत्रातील सर्व वन कर्मचारी यांचे मार्फत करण्यात आली.














