पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकारातून खारेपाटण किल्ला येथे शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येणार

युवकांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार

खारेपाटण (संतोष पाटणकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर वसलेल्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या खारेपाटण या गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचा इतिहास विरगळच्या माध्यमातून जिवंत ठेवणाऱ्या खारेपाटण किल्ल्यावर महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत लवकरच शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण गावचे माजी सरपंच व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या महसूल विभागाच्या एका नियोजित प्रशासकीय कार्यक्रमासाठी दोन महिण्यापूर्वी खारेपाटण येथे आल्या असता त्यांनी देखील यावेळी आवर्जून खारेपाटण किल्ल्याला भेट देऊन या ऐतिहासिक किल्ल्याची पाहणी केली होती.व शासनाकडे प्रस्ताव सादर करा अशा सूचना दिल्या होत्या.याबाबत खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना खारेपाटण किल्ला दुरुस्ती बाबत व तेथे पर्यटनाच्या दृष्टीने शिवसृष्टी उभारण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले होते. याची तत्काळ दखल घेत नामदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांना लेखी पत्र देऊन मौजे खारेपाटण येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत शिवसृष्टी प्रकल्प उभा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संबंधित वरिष्ट अधिकाऱ्यांना खारेपाटण किल्याची प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन पाहणी करून तशा प्रकारचा अहवाला शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पथकाने नुकतीच खारेपाटण किल्ल्याला भेट देऊन या संपूर्ण परिसराची ड्रोन कॅमेरा द्वारे शूटिंग करण्यात आली असून यावेळी खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव जि. प. सदस्य प्राची ईसवलकर पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, माजी सरपंच रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

खारेपाटणसह आजूबाजूच्या परिसरात अनेक नैसर्गिक व धार्मिक पर्यटन स्थळे असून या सर्व ठिकाणांना जोडणारा शिवसृष्टी प्रकल्प खारेपाटण किल्ला येथे उभा राहिल्यास तो एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरू शकतो. त्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून येथील स्थानिक युवकांना रोजगाराच्या अनेक संधी यानिमित्ताने निर्माण होणार असून येथील छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना चालना मिळू शकते.त्यामुळे खारेपाटण गावचे नाव पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र सह जगाच्या नकाशावर जायला वेळ लागणार नाही. दरम्यान खारेपाटण किल्ला येथे सुमारे २ ते ३ एकर जागेत हा शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येणार असून स्थानिक ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ही जागा येत असल्यामुळे खारेपाटण च्या वैभवात यामुळे भर पडणार आहे. तर किल्ला संवर्धन समिती व मावळे आम्ही स्वराज्याच्या टीम च्या वतीने ऋषिकेश जाधव व मंगेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्याची दरवर्षी साफ सफाई स्वच्छता केली जाते. तर श्री देव काळभैरव – दुर्गादेवी ट्रस्ट खारेपाटण यांच्या वतीने अध्यक्ष मधुकर शेठ गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली देखील किल्ला परिसरात स्वच्छता राबविण्यात येत आहे.

या सुविधा निर्माण करणार –
१) खारेपाटण किल्ल्याची तटबंदी ची व ढासळलेल्या बुरुजांची पुनर्बांधणी करून त्याला आकर्षक डिजाइन करण्यात येणार
२) खारेपाटण किल्याची भुयारी मार्गाची खोदाई करून पर्यटनासाठी खुले करणार
३) येथे असलेल्या प्राचीन दुर्गादेवी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात येणार
४) गाईड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र स्थापन करून किल्याची माहिती देणार
५)खारेपाटण किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढी पुतळा उभारून भव्य सुंदर गार्डन बनविणार
६) छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास मावळ्यांच्या छोट्या मोठ्या मूर्ती व चित्रकलेतून साकारणार
७ खारेपाटण किल्ल्यावर बाजार समितीचे पेठेतून थेट किल्यावर जाणारी जुन्या पायऱ्यांची पायवाट कातळी दगडी बांधून दुरुस्त करण्यात येणार
८) किल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व प्राथमिक नागरी सेवा सुविधा निर्माण करण्यात येणार

" खारेपाटण शहराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून समृद्ध असा शिवकालीन वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार या परिसरात जलवाहतूक व्यवस्था कार्यरत होती. व व्यापाराच्या दृष्टीने या भागाला विशेष महत्व होते.येथील बारामाही वाहणारी शुक नदीमार्ग व किनारी भागाचा उपयोग करून व्यापारी हालचाली होत असत याचे पुरावे इतिहासात आढळतात. तसेच खारेपाटण परिसरात किल्ल्याचे अवशेष आढळून येतात, जे त्या काळातील संरक्षण व्यवस्थेचे प्रतीक आहेत."
error: Content is protected !!