वाढदिवसाच्या निमित्ताने भेट म्हणून झाडे आणी वह्यांचे संकलन
कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सदस्य सौ सुप्रिया संदीप मेस्त्री यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कलमठ श्री देव काशी कलेश्वर सभागृहात केक कापून साजरा झाला.
भेट म्हणून पुष्पगुच्छ नको झाड किंवा वही द्या या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात वह्यांचे संकलन वाढदिवसाच्या निमित्ताने झाले या वह्यांचे वितरण जिल्हा परिषद मतदार संघातील गरजूंना केल्या जाणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया संदीप मेस्त्री यांनी सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,उपसभापती सोनू सावंत, माजी सभापती प्रकाश सावंत सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी, सरपंच संदीप मिस्त्री वरवडे,सरपंच करुणा घाडी कलमठ उपसरपंच दिनेश गोठणकर,माजी सरपंच सुहास राणे, विनोद परब,सुहास राणे, महेश लाड,अचित कदम, इब्राहिम शेख,निसार शेख, आनंद घाडी,स्वप्नील चिंदरकर, विनिता बुचडे,अनील मेस्त्री, किशोर लाड,तनोज कळसुलकर, अनंत हजारे, सुभाष मालंडकर, नितीन पवार, अनुप वारंग, स्वाती नारकर, तेजस लोकरे, सागर पवार, परेश कांबळी, मिलिंद चिंदरकर, श्रेयस चिंदरकर, बाबू नारकर, गौरी साळकर, प्रथमेश धुमाळे,प्रकाश साखरे,दिनार लाड, सचिन कुवळेकर, पपू यादव, आबा कोरगावकर, संतोष रेवंडकर, काका कदम, मंदार मेस्त्री,पंढरी परब,सुशील तिर्लॉटलर, शिवम धानजी, समीर कवठनलर, विजय कदम, सुदेश देसाई,अनील घाडी उपस्थित होते.











