तळेरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद च्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातून परिसर स्वच्छता या विशेष उपक्रमांतर्गत वारगाव गावात ग्रामस्थांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम 4 जून रोजी सकाळी राबविण्यात आली. आपला परिसर आपली स्वच्छता या उक्तीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या मार्गदर्शनाखाली वारगाव ग्रामपंचायत च्या वतीने आणि गावातील ग्रामस्थांच्या सहभागाने आज सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान दोन तास विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावातील महिला, तसेच पुरुषांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत सार्वजनिक परिसर चकाचक केला. यावेळी सरपंच नाना शेट्ये, ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र नलावडे, ग्रामपंचायत सदस्य,मुखाध्यापक श्रीम तळगावकर, शिक्षक श्रीम शेट्ये, श्रीम जंगले, श्री चव्हाण, श्रीम देसाई, ग्रामहसुल अधिकारी रविंद्र आम्रासकर, आरोग्य सेवक तेली, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, धननिरंकार मंडळ, वारगाव ग्रामस्थ स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.














