“आभाळमाया” ग्रुप ठरतोय रुग्णांसाठी तारणहार

ऑन कॉल लाईव्ह रक्तदानासह रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबीरे ठरतायत लक्षवेधी

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वराड गावचे सुपुत्र राकेश डगरे आणि त्यांचा मित्रपरिवार यांनी सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या विचारांच्या प्रेरणेतून सुरु केलेल्या आभाळमाया ग्रुपने सन २०२० म्हणजेच कोरोना काळापासून पासून अवघ्या ३० रक्तदात्यांपासून सुरू केलेला प्रवास आज जिल्ह्यातील एक नंबरचा रक्तदात्यांचा ग्रुप म्हणून प्रसिद्धीस आला. आता आभाळमाया ग्रुपच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदाते रक्तदान करताना दिसत आहेत. त्यामुळे हा ग्रुप फक्त वराड गाव किंवा कट्टा पंचक्रोशीपुरता मर्यादित राहिला नसून जिल्ह्यातील तसेच मुंबई मधील रक्तदातेही या ग्रुपमध्ये सामील झालेले आहेत.

मागील महिन्याभरात आभाळमाया ग्रुपच्या तब्बल 30 रक्तदात्यांनी केले लाईव्ह रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. रुग्णांना तातडीने आवश्यक असलेली रक्ताची कार्ड आणि हॉस्पिटलमध्ये लाईव्ह रक्तदात्याची गरज असल्यास
जिल्हाभरातून रुग्णांच्या नातेवाईकांचे तसेच हॉस्पिटलमधून सर्वप्रथम आभाळमाया ग्रुपच्या रक्तदात्यांना सर्वप्रथम कॉल येतात.

२०२० मध्ये फक्त ३० रक्तदात्यांनी सुरू केलेला प्रवास आज जिल्ह्यात रक्तदात्यांची पंचक्रोशी म्हणून ओळख निर्माण करत आहे. कडक उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित होत नसल्याने जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असताना आभाळमाया ग्रुप रुग्णांना मदत करून वरदान ठरत आहे.
सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम साहेब यांच्या विचारांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या आभाळमाया ग्रुपचे रक्तदाते रक्तदानासाठी तत्पर असतात. सिंधुदुर्ग, मुंबई, गोवा, कोल्हापूर येथे अनेक रुग्णांना रक्तदान करून ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. गेली पाच वर्षे एकही रुपया न घेता हजारो रुग्णांना कॅम्पद्वारे, रक्ताची कार्ड, लाईव्ह डोनरच्या माध्यमातून रक्ताची चळवळ सुरू ठेवली आहे. अशी प्रतिक्रिया आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांनी दिली आहे.

ग्रुपच्या अनेक सदस्यांपैकी छोटू ढोलम,समीर रावले, गणेश मोरजकर, नितीन शेट्ये,प्यारी आंबेरकर, गौरव हिर्लेकर, स्मिता कंप्यूटरच्या संचालिका श्रद्धा सुनील नाईक, युवराज ढोलम, ज्ञानेश्वर चव्हाण, पप्पू चव्हाण,किरण रावले, दादा वराडकर, कु.समीर मुंबरकर, कु. तेजस म्हाडगुत, कु.अक्षय गावडे,सिद्धू पेणकर, शेखर मसुरकर,गणेश गाड, शुभम मसुरेकर, भाई वेंगुर्लेकर, कु.हृषिकेश परब, कु.प्रणित चव्हाण, कु. विनय मठकर, कु. मंदार मठकर, कु. प्रवेश यादव, परेश घोगळे, संतोष परब गुरुजी, डॉ.प्रथमेश वालावलकर,जगदीश परब,विनोद आळवे, राजन माणगावकर, कु.सर्वेश पांचाळ,राहुल डगरे, नाना म्हाडगुत,शिवा शिरोडकर, कु.प्रेम परब,अनिकेत सावंत सर,बाबल हिर्लेकर, प्रमोद निकम, श्रीकांत चव्हाण, प्रदीप मिठबावकर, कु.अवधूत चव्हाण,सुशील गावडे,सुमित सावंत, मंदार वराडकर, कु.दीपक कवठणकर, महेश यादव आणि गणेश पार्टे,

कु.वैभव कवठणकर, कु. प्रजेश रावले,अभि परब, मकरंद सावंत, विकीराज गावडे, विद्याधर चिंदरकर, अनिल चव्हाण, विकास लुडबे, कु.अभिषेक रावले, कु.ओमकार परब, विनय निकम या ग्रुप सदस्यांनी वेळोवेळी लाईव्ह रक्तदानासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. याबद्दल सर्व ग्रुप सदस्य आणि रक्तदात्यांचे राकेश डगरे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!