स्मशानभूमी परिसर सुशोभित आणि हरित परिसर बनविण्यासाठी सरपंच हनुमंत तळेकर यांचा प्रयत्न
तळेरे (प्रतिनिधी) : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने तळेरे स्मशानभूमी परिसरात सावली व फळे देणाऱ्या विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. स्मशानभूमी परिसर सुशोभित आणि हरित परिसर बनविण्यासाठी निसर्गप्रेमी सरपंच हनुमंत तळेकर यांचा ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करत आहेत. तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर यांनी आपल्या कारकिर्दीत चांगल्या कामांसोबतच सर्वांगीण विकास आणि स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी विशेष पावले उचलली आहेत. वृक्षारोपण करून वृक्षलागवड करणे आवश्यक असल्याने तळेरे येथील श्री देव गांगेश्वर मंदिर देवराई परिसर आणि तळेरे स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करुन त्यांचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
यावर्षी देखील या उपक्रमाला आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज तळेरे स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच त्यांना आवश्यक सेंद्रिय खत देऊन संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. त्यामुळे वृक्षसंपदेत वाढ होऊन स्मशानभूमी परिसर हरित होण्यास मदत होणार आहे.
आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, ग्रामविकास अधिकारी राजलक्ष्मी जाधव, माजी पं.स.सभापती दिलीप तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, ग्रा.प.सदस्य सागर डंबे, माजी उपसरपंच शशांक तळेकर, शैलेश सुर्वे, सौ. तळेकर, सौ. चव्हाण, सुयोग तळेकर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश सोरप, डॉ.धनश्री जाधव, ग्रा.प.कर्मचारी बाबू मेस्त्री, नंदू देसाई व इतर तसेच आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आणि कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाटचे विद्यार्थी अरिहंत अंकलखोपे, आदर्श कोरे, संग्राम पाटील, रोहित देशपांडे, शर्विल पाटील, प्रतिक मोरस्कर, हर्षल पालये, तन्मय पालये, हिमांशू राणे, ओंकार सुतार आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. वृक्षारोपण उपक्रमांमध्ये फोंडाघाट येथील कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच निसर्ग मित्र परिवार आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
















