महामार्ग पोलिसांची मद्यपी चालकावर दमदार कारवाई

मद्यपि वाहनचालकांवर 40 हजारांचा दंड

कणकवली (प्रतिनिधी) : महामार्गावर सतत घडणारे गंभीर अपघात चालकांनी मद्यसेवन करून वाहन चालविल्याने होत आहेत.त्यावर आळा बसावा यासाठी वाहतूक पोलिसांना दिलेल्या आदेशानंतर महामार्ग पोलिसांनी मद्यसेवन केलेल्या 4 वाहन चालकावर कारवाई केली. सदर कारवाईत मद्यपी वाहन चालकांनी कणकवली न्यायालयात प्रत्येकी 10,000/- असा 40,000 रुपये दंड भरला. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती राणी पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, पोलीस अंमलदार सुरेश बिर्जे,नितीन शेट्ये, रवी इंगळे,पांडुरंग खडपकर, सागर परब यांनी धडक मोहीम सुरू केलेली आहे. श्रीमती राणी पाटील यांनी चालकांना वेगावर नियंत्रण ठेऊन तसेच मद्यसेवन न करता महामार्गावर सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केलेले आहे. मद्यपी वाहन चालक यांच्यावरील कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे कळविले आहे.

error: Content is protected !!