सावंतवाडी (प्रतिनिधी) : दीपक केसरकर मंत्री असले तरी त्यांच्या पत्राला कोणीही विचारत नाही आपण लोकांची कामे करतो असे ते सांगतात, पण कोणाची कामे होत नाहीत ते वेळेवर कोणाच्या कार्यक्रमाला जात नाहीत. त्यामुळे सावंतवाडी मतदार संघाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत कट्टर शिवसैनिक निवडून देवूया कोणी गद्दार नको, अशी जहरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी येथे केली. दरम्यान राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळालय पण या पदाचा उपयोग काय? हेच त्यांना कळलेले नाही. फक्त आलीशान ऑफीस मध्ये बसायचे आणि बॉडीगार्ड फिरवायचे एवढेच त्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांच्या, मंत्रीपदाच्या माध्यमातून एक ही विकास या ठिकाणी झालेला दिसत नाही, असे ही त्यांनी सांगितले.
निरवडे येथे भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तालुका प्रमुख रुपेश राऊळ आणि संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आयोजित मेळाव्यात ते उपस्थितांना मार्गदर्शन करतान बोलत होते.
यावेळी राऊत म्हणाले, ज्यांना शिवसेनेने मोठे केले अशा बाजार उंडग्याकडुन आता शिवसेनेला उपदेश दिला जात आहे. आमच्या पक्षासह नेत्यांवर टिका करणाऱ्या दीपक केसरकर यांचे शिवसेनेतील वय आणि काम काय होते. त्यावेळी त्यांना अक्कलदाढ तरी आली होती का? असा सवाल त्यांनी करुन आमच्या नेत्यांवर टिका करणे केसरकरांनी बंद करावे, अन्यथा गोव्याच्या हॉटेल मध्ये बसून काय मिळवले हे जाहीर कराव लागेल, असा इशारा दिला. ते पुढे म्हणाले, काल तीच परिस्थिती केसरकरांची आहे. आपण शालेय मंत्री आहोत, असे त्यांना सांगावे लागते. साच्या जिल्हा परिषद शिक्षकांचा पगार देणे त्यांना समज नाही. आलेल्या प्रत्येकांचे काम करुन देणार त्यांना आपले पत्र देणार परंतू त्यांच्या पत्राला कोणी विचारत नाही आम्ही काम ही होत नाही. त्यामुळे येथील जनतेने आगामी काळात नेमके कोणाच्या पाठिशी रहावे हे ओळखावे, पुन्हा एकदा कट्टर शिवसैनिक असलेला आमदार सावंतवाडी मतदार संघात निवडून द्यायचा आहे. त्यासाठी येथील जनतेने कामाला लागावे असे आवाहन यानी केले.
आमदार दीपक केसरकर हे खोटारडे आणी ढोगी आहेत. ज्या शिवसेनेने त्यांना मंत्रीपद दिले त्याच सेनेवर ते आज तोंडसूख घेत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत त्यांचा खोटा बुरखा फाडल्याशिवाय येथील शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत. असा इशारा खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी येथे दिला आत्ताची भाजप ही राणे मिश्रीत आहे खऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी जागा नाही त्यामुळे ऐरव्ही पुढे पुढे करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांची टिव टिव सध्या बंद झाली आहे. तर, राणे आणी त्यांचे बगलबच्चे आपला स्वार्थ कसा काय साधतील याकडे लक्ष देवून आहेत अशी ही टिका त्यांनी केली.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख रूपेश राऊळ, बाळा गावडे, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, विधानसभा समन्वयक अतुल रावराणे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, राजू नाईक, दोडामार्गचे बाबुराव धुरी, शब्बीर मणियर, राजू मुळीक, आबा सावंत, राजू मुळीक, सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक, संजय तानावडे आदी मान्यवर उपस्थित होते.