कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समिती मधील सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक नीलम नामदेव जाधव यांना महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीलम जाधव यांना सन 202 -23 सालचा महाराष्ट्र राज्य शासनाचा गुणवंत पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण 27 मे रोजी मुंबई येथील जाहीर समारंभात करण्यात आले. ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,स्मृतिचिन्ह प्रदान करून नीलम जाधव यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी नामदेव जाधव उपस्थित होते.















