सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर अवघ्या 24 तासात मान्सूनही दाखल झाला. मात्र मे महिन्यात दाखल झालेल्या या मान्सूनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कुडाळ तालुक्यातील तळ्याचे टेम्ब हुमरमळा अनाव या क्षेत्रात चार हेक्टर शेतीतील भुईमूग नाचणी, चवळी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्याच्या 15 तारीख पासूनच पाऊस सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या शेतीच नुकसान झाल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने शासनाकडे नुकसान भरपाई साठी विनवणी केली आहे.
प्रशासनाने शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून कुडाळ तालुक्यात तळ्याचे टेम्ब हुमरमळा अनाव येथे शेतीचे 70 ते 80 टक्के नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने पंचनामे घालण्यात आले आहेत असे या ठिकाणी पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.



















