माजी सभापती नासिर काझी यांच्या गाडीची दारुड्या तरुणाकडून तोडफोड…. वैभववाडी पोलिसात तक्रार..

वैभववाडी (प्रतिनिधी) : मद्यपी तरुणाकडून माजी सभापती नासीर कमृद्दीन काझी रा तिथवली यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. गाडीचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी ६. ३० वाजण्याच्या सुमारास तिथवली येथे घडला. महेश संभाजी तांबे रा.केळवली ता राजापूर असे त्या मदयपी तरुणाचे नाव असून ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.      

काझी यांनी मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घराशेजारी शेड मध्ये आपली गाडी उभी करून ठेवली होती. बुधवारी पहाटे ४. ३० च्या सुमारास तो तरुण मद्यधुंद अवस्थेत काझी यांच्या घराकडे आला होता. त्यावेळी काझी नमाज पडण्यासाठी मशिदीकडे जात होते. त्याने त्याला समजावून तिथून हाकलून दिले. तिथून तो तरुण माजी पोलीस पाटील गणेश हरियाण यांच्या घरी जाऊन घराच्या दरवाज्यावर जोर जोरात लाथा मारून आरडा ओरड केली. यावेळी गणेश हरियाण व त्यांचे कुटुंबिय जागे झाले. त्यांनी लाईट लावून बाहेर येई पर्यत तो तिथून पसार झाला. तिथून तो परत काझी यांच्या घराकडे आला. त्यावेळी काझी कुटुंबीय झोपलेले होते. त्याने हातातल्या लाकडी बांबूने काझी यांची शेड मध्ये लावल्या गाडीच्या मागच्या व बाजूच्या काचावर प्रहार करीत काचा फोडू लागला. दरम्यान काझी यांचा पुतण्या घरा शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आला होता. तो आवाज एकूण तो पुढे गेला. त्याला बघून आरोपी पाळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र काझी यांच्या पुतण्याने आरडाओरड केल्यामुळे ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी त्याला रंगेहात पकडले. याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत सदर तरुणाला ताब्यात घेतले आहे. सदर तरुण तिथवली पासून जवळ असलेल्या केळवली ता राजापूर येथील आहे.तो तिथवली येथे दारू पिण्यासाठी नेहमी येत असल्यामुळे तो चेहऱ्याने गावातील लोकांच्या ओळखीचा होता.गावात काजू, आंबा, खैर चोरी करून गावातील लोकांना त्रास देत असल्याची माहिती केळवली पोलीस पाटील व ग्रामस्थांनी वैभववाडी पोलिसांना दिली आहे. गाडीच्या काचा फोडून नुकसान केल्याची तक्रार काझी यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. चौकट.. या प्रकारमुळे तिथवली गावात सुरु असलेले अवैद्य दारू विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!