मुंबई जुहू येथील अधिश बंगल्यावर घेतली भेट
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री वरवडे गावचे सुपुत्र नितेश नारायणराव राणे यांची वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भेट घेत वरवडे गावचे युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अचित कदम यांनी अभिष्टचिंतन केले. वरवडे गावचे सुपुत्र असलेले नामदार नितेश राणे यांचा मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पहिलाच वाढदिवस 23 जून रोजी साजरा होत आहे. यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अचित कदम यांनी मुंबई जुहू येथील राणे यांच्या अधिश निवासस्थानी सदिच्छा भेट घेत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी सुचित कदम ,मिलिंद कदम ,प्रशांत कदम ,अक्षय पालव आदी उपस्थित होते.












