त्रिंबक येथे २९ जून रोजी वृक्षारोपण अभियान..!

ग्रामपंचायत त्रिंबक जागृत उन्नती मंडळ त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या हस्ते होणार वृक्षारोपण शुभारंभ

आचरा (प्रतिनिधी) : निसर्ग सुंदर त्रिंबक हा ध्यास धरून ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृत उन्नती मंडळ त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ जून रोजी सकाळी १० वाजता त्रिंबक सापळा येथे वृक्षारोपण अभियान क्र २ चा शुभारंभ आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान त्रिंबक येथे २०२४ पासून वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत असून हे २ रे वृक्षारोपण अभियान आहे. या वृक्षारोपण अभियानाला त्रिंबक सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, जागृत उन्नती मंडळचे पदाधिकारी सदस्य उपस्थित राहणार असून सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहवे असे आवाहन ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृत उन्नती मंडळ त्रिंबक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!