गांधीनगर – खलांतर येथील उबाठा चे युवा कार्यकर्ते प्रथमेश सावंत यांचा भाजप मध्ये प्रवेश

संदेश सावंत यांचा उबाठा विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांना पुन्हा एकदा दे धक्का

कणकवली (प्रतिनिधी) : गांधीनगर खलांतर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा कार्यकर्ते प्रथमेश सावंत यांनी कनेडी बाजारपेठ येथील भाजप च्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयात भाजप मध्ये प्रवेश केला माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले  पालकमंत्री नितेश राणे यांनी गांधीनगर गावच्या विकासासाठी भरघोस असा निधी दिला माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत व सौं संजना सावंत यांची गावच्या विकासकामांसाठी असलेला सतत चा पाठपुरावा, याने प्रेरित होऊन आपण भाजप मध्ये प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले या प्रवेशा वेळी माजी जि प अध्यक्षा सौं संजना सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, सुधीर सावंत, प्रशांत सावंत, मिलिंद बोभाटे,श्रीकांत सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!