पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कनेडीत जिलेबी ,काजू रोप वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कनेडी बाजार पेठ येथील भाजप नाटळ- सांगवे विभागीय कार्यालय  येथे ग्रामस्थांना जिलेबी व काजू रोपे वाटप माजी जि प अध्यक्षा सौं संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जि प अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे,माजी प स सदस्या राजश्री पवार सांगवे उपसरपंच प्रफुल्ल काणेकर दारिस्ते उपसरपंच संजय सावंत, भाई गावकर, मिलिंद बोभाटे,विनोद सावंत मीनल पवार, सुधीर सावंत तसेच विभागातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!