नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत दशावतार नाट्य महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचेआयोजन करण्यात आले आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ७.३० वाजता होणार असून विविध नामांकित दशावतार नाट्यमंडळे आपले सादरीकरण करणार आहेत.

हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे आयोजित करण्यात आला असून स्थानिक नागरिकांसाठी हा सांस्कृतिक मेजवानीचा आनंद देणारा सोहळा ठरणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत तसेच कणकवली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

दशावतार ही कोकणातील पारंपरिक लोककला असून या कार्यक्रमामुळे कणकवली परिसरातील नागरिकांना सलग सहा दिवस दर्जेदार नाट्यप्रयोग पाहण्याची संधी मिळणार आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!