अध्यक्ष गणपत वळंजू व मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर यांची माहीती
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सारख्या सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या छोट्याश्या गावात उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून फोंडाघाट मधील ग्रामस्थांनी आपल्या दुरदृष्टीने १९९१ मध्ये स्थापन केलेल्या सिंधुदुर्गाच्या सहकार क्षेत्रात सातत्याने आपल्या कार्याचा ठसा उमटवून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपले कार्यक्षेत्र विस्तारीत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट या पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा पतसंस्थेचा लेखाजोखा सादर केला असून व्यवसायातील आपला चढता आलेख कायम ठेवला आहे. संस्था सहकाराच्या ‘विना सहकार नहीं उद्धार’ या तत्त्वाप्रमाणे काम करत आली असून संस्थेने संस्थेचा सभासद ग्राहक हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वागिण विकासाकरिता सतत प्रयत्नशिल राहणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून आजतागायत आपली वाटचाल केली असून याच जोरावर संस्था अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारूपास आली आहे. नफा कमविणे हा हेतू न ठेवता सर्वसामान्य सभासद ग्राहक आर्थिक सहकार्यातून स्वतःच्या पायावर भक्कमपणे कसा उभा राहिल याला जास्त महत्व दिले आहे. याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा कसोशीने आपल्या कामकाजात वापर करत ग्राहकांस तत्पर तसेच चांगली सेवा कशी मिळेल वाकरिता संस्था सातत्याने प्रवत्नशिल राहिली आहे.
संस्था आज सीबीएस मध्ये काम करत असून संस्थेने मोबाईल अॅप, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, क्युआर, एसएमस अर्लट, नेट बँकिंग, इनोंच, डोअर स्टेप बँकिंग, मोवाईल अॅप, पेपरलेस बंकिंग तसेच पासबुक प्रिंटींग या सारख्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर पिग्मी संकलन हे पिम्मी मशिन बरोबरच मोबाईल अॅप व्दारे सुरू केले आहे. त्याचप्रमाणे लवकरच ग्राहकांना वैयक्तिक क्युआर सुविधा सुरू होत आहे व स्कॅन अॅण्ड पे ची मुविधा उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही आजची काळाची गरज आहे. त्यास प्राधान्य देउन संस्थेने तत्पर व पारदर्शक सेवा देण्यास आपण कटीबंध असल्याचे दाखवून दिले आहे. संस्थेच्या आर्थिक स्थिती तसेच सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेत संस्थेस अनेक संस्थांनी विशेष पुरस्कार देउन गौरविले आहे. विशेष उल्लेख करावयाचा तर अबिज्ञ पब्लिकेशन, कोल्हापूर यांनी संस्थेस ‘बॅको ब्लू रिबन’ हा मानाचा मानला जाणारा पुरस्कार देउन अनेक वेळा गौरविले आहे.
संस्थेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात आपला प्रगतीचा चढता आलेख कायम राखत अपेक्षित उद्दीष्ट साध्य करण्यात संस्था यशस्वी झाली आहे. सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाच्या जारावर संस्थेने आपली घोडदौड चालू ठेवली असून त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे
आहे. या आर्थिक वर्षा अखेर संस्थेचे भाग भांडवल रु. ३ कोटी ८६ लाख झाले असून त्यामध्ये ६.२८ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे ठेवी रू. १९१ कोटी ०७ लाख झाले असून त्यामध्ये २६.८२ टक्के वाढ, कर्ज रू. १५४ कोटी ६० लाख झाले असून त्यामध्ये २१.७० टक्के वाढ, निधी रू. १४ कोटी ६० लाख झाले असून त्यामध्ये २५.४२ टक्के वाढ, गुंतवणूक रु. ५७ कोटी ५१ लाख झाले असून त्यामध्ये ४२.८४ टक्के वाढ झाली आहे. संस्थेस ढोबळ नफा १० कोटी ७९ लाख झाला असून आवश्यक तरतूदी केल्या नंतर सन २०२५-२६ सालाकरिता रू. ३ कोटी २५ लाखांचा निव्वळ नफा आलेला असून यामध्ये ३२.५७ टक्के इतकी भरघोस वाढ झालेली आहे. मंस्थेचे खेळते भांडवल रू. २२० कोटी ८५ लाखाचे झाले असून उलाढाल रू. १३६५ कोटी ८० लाख पर्यंत गेली आहे.
संस्था आर्थिक व्यवहार करण्याबरोबरच सामाजिक भानही चांगल्या प्रकारे जपत आहे. बाढती स्पर्धा लक्षात घेता सभासदाभिमूख योजना संस्था सातत्याने राबवित आहे. सभासदांना आधुनिक दर्जेदार सोयी सुविधा मिळाल्या पाहीजेत, आपला सभासद या पासून कुठेही मागे राहता नये याकरिता संस्था युध्द पातळीवर काम करत आहे. संस्थेने या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्हयात आजरा, सिंधुदुर्ग जिल्हयात आचरा व रत्नागिरी जिल्हयात पाचल या नवीन शाखा सुरू केल्या असून वा ठिकाणच्या सभासद ग्राहकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून संस्थेच्या सादाला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद दिला आहे. येणा-या काळात संस्थेच्या कोल्हापूर जिल्हयात राधानगरी तसेच रत्नागिरी जिल्हयात राजापूर या ठिकाणी नवीन दोन शाखा लवकरच सुरू होत आहे. संस्थेचा वाढता विस्तार तसेच होणारी प्रगती ही संस्थेच्या सभासद व ग्राहकांनसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे संस्थेचे चेअरमन श्री. गणपत विठोबा वळंजू तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. ईश्वरदास शामसुंदर पावसकर यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या या प्रगतीमध्ये संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ग्राहक, हितचिंतक, कर्मचारी तसेच अल्पबचत प्रतिनिधींचे फार मोठे योगदान असल्याचे आर्वजून सांगितले. येणा-या काळात सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक तसेच असंख्य हितचिंतकांनी संस्थेच्या या विकासपर्वात संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करून संस्था विकासात सर्वांनी हातभार लावण्याचे आव्हान यावेळी अध्यक्ष श्री. गणपत वि. वळंजू, उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर र. कुशे, संचालक श्री. दिलीप रा. पारकर, श्री. सुनिल दि. कोरगांवकर, श्री. गणपत शं. पारकर, श्री. संजय धा. पेडणेकर, श्री. सुनिल श. डुबळे, अॅड. श्री. समिर प्र. वंजारी, श्री. उमेश स. बाळके, सौ. अनिता अ. रेवडेकर, सौ. रश्मी रा. माणगांवकर आणि मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. ईश्वरदास शा. पावसकर उपस्थित होते.












