सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोरील ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज स्वामींच्या चरण पादुकांचे आगमन…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील पोलीस स्टेशनच्या समोरील परिसरात नवनिर्मित ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज, गुरुवारी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरातील मूळ स्वामी पादुकांचे आगमन होणार आहे. अक्कलकोट येथून विशेष रथाने येणाऱ्या या पवित्र चरण पादुका आज संध्याकाळी ४:३० ते ७ या वेळेत सर्व भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात खुल्या ठेवण्यात येणार आहेत. अवघ्या अडीच तासांच्या या मर्यादित वेळेत स्वामी भक्तांना पादुकांचे थेट दर्शन आणि आशीर्वाद घेण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे. या सोहळ्याचे पावित्र्य आणि महत्त्व लक्षात घेता, सावंतवाडी शहर व परिसरातील जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी आणि नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून या पावन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन ‘श्री औदुंबर स्वामी मंदिर’ उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!