बांदा (प्रतिनिधी) : मडूरा – रेडकरवाडी येथील दत्ताराम (आजो) महादेव परब (५२) यांचे शुक्रवारी रात्री बांबोळी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. मडूरा सोसायटीचे ते विद्यमान संचालक होते. मडूरा दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेचे ते संचालक होते. मडूरा श्री देवी माऊली नवरात्रौत्सव समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली होती. रंगभूमीवर विविध सामाजिक नाटकात त्यांनी प्रभावी काम केले होते. सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई, भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे.

दत्ताराम परब












