बांद्यात भाजपतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

बांदा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या वतीने बांदा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा व जीवनगाथेचा गौरव करण्यात आला. सन २०२६ हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती वर्षानिमित्त विशेष स्वरूपात साजरे करण्यात येत असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील भाजप कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने बांदा येथेही जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श कारभाराचा, लोककल्याणकारी धोरणांचा तसेच समाजहितासाठी केलेल्या योगदानाचा आढावा घेतला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेची भावना जोपासण्याचे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ भाजप पदाधिकारी तथा माजी जिल्हाध्यक्ष शामजी काणेकर, माजी सरपंच शीतल राऊळ, बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, शहराध्यक्ष निलेश नाटेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, बूथ अध्यक्ष नीलू देसाई, माजी सरपंच बाळा आकेरकर, संदीप बांदेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाला अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

error: Content is protected !!