सावंतवाडीत भाजप जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श प्रशासन, लोककल्याणकारी कार्य आणि समाजसेवेतील योगदानाचा गौरव केला. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजहिताची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास भाजपा युवानेते विशालजी परब, विकास परब, भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, सावंतवाडी शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, श्रीकांत राजाध्यक्ष, साईप्रसाद भोई, साई नाईक, योगेश पेंडसे आदी उपस्थित होते. जयंतीनिमित्त उपस्थितांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन केले.

error: Content is protected !!