भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका अँड. सुषमा खानोलकर यांनी कुशल प्रशासक, पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना त्या आदर्श राजमाता व अष्टपैलु राज्यकर्ता असल्याचे सांगितले. तसेच अहिल्यादेवी शिवभक्त होत्या.शिवाचे अस्तित्व सगळीकडे आहे, असे त्या मानत. मल्हारराव होळकर यांच्यासारखे अहिल्यादेवींना एक श्रेष्ठ गुरु, मार्गदर्शक मिळाल्याने राज्यकारभारात त्या निपुण झाल्या. या आधारा वरच अहिल्यादेवींनी माळव्या प्रांतावर सुराज्य केले. तब्बल २९ वर्षे माळवा प्रांतावर लोककल्याणकारी राज्य केले. अहिल्यादेवींनी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. त्यांच्या राज्यात कोणतीही विधवा दत्तकपुत्र होऊ शकत असे. अहिल्यादेवी होळकर या एक खरोखरच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सुक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या, अशा पध्दतीत त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम समीतीचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सचिन शेट्ये (नगरसेवक), चेतना रजपूत (चिटणीस), काजल कुबल (नगरसेविका), वृंदा गवंडळकर (जि. उपाध्यक्ष. महिला मोर्चा), गौरी माईणकर (नगरसेविका), रिया वासुदेव केरकर (नगरसेविका), सदानंद तुळशीदास गिरप (नगरसेवक), आकांक्षा आनंद परब (नगरसेविका), प्रणाली धनंजय खानोलकर (चिटणीस), वसंत महादेव तांडेल (ता. सरचिटणीस), शीतल आंगचेकर (नगरसेविका) इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!