कुरंगवणे पवारवाडी वडाचा नाका पिक अप शेड चे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती तसेच खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी मिलिटेड खारेपाटण या संस्थेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील कुरंगवने या गावातील पवारवाडी वडाचा नाका येथे एस टी बस थांबा अर्थात पिक अप शेडच्या कामाचे भूमिपजन नुकतेच कणकवली तालुका भाजप अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.

कुरंगवणे ग्रामपंचायत व गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या माध्यमातून प्रवाशांच्या सोयीसाठी कुरंगवणे येथे बांधण्यात येत असलेल्या प्रवासी शेडच्या कामाचा शुभारंभ कणकवली भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य रवींद्र जठार, खारेपाटण पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, तळेरे पं. स. सदस्य राजेश जाधव सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, उपसरपंच बाबला गोसावी, शेर्पे सरपंच विशाखा पांचाळ, उपसरपंच सिराज मुजावर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थ भूषण शेलार, बबलू पवार, श्रीकांत वरुणकर, अरुण कर्ले, उदय बारस्कर, माजी सरपंच सरिता पवार, रामा पांचाळ, ग्रा. पं. सदस्य विशाखा राऊत, रवींद्र पवार, पोलिस पाटील देवेन गोसावी, संजय लाड, बाबू जाधव, चिमाजी राऊत, सूर्यकांत पवार, मधुसूदन पवार, अशोक पवार, प्रकाश पवार आदी उपस्थित होते. यावेळी माजी जि. प. सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांचा वाढदिवसा भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला. व त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

कुरंगवणे पवारवाडी वडाचा नाका पिक अप शेडच्या कामाचा श्रीफळ फोडून शुभारंभ करताना भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, बाजूला रवींद्र जठार, पं. स. सदस्य गुरू शिंदे,राजा जाधव, सरपंच पप्पू ब्रम्हदंडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!