कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तरंदळे गावात गुरुवार, ४ जून रोजी ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.तरंदळे ग्रामपंचायत, तरंदळे टेवणादेवी मंदिर तसेच तरंदळे धरण परिसरात ग्रामसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी संजना राणे – पंचायत समिती सदस्य सूर्यकांत वारंग – विस्तार अधिकारी
सुशिल कदम – सरपंच
रेश्मा माळकर – ग्रामपंचायत अधिकारी
सत्यवान राणे – माजी तंटामुक्ती अध्यक्ष
जयसिंग नाईक – माजी सरपंच
विद्या रासम – समुदाय आरोग्य अधिकारी
गव्हाणे भाऊ – आरोग्य सेवक
अनिता कदम – आशा स्वयंसेविका
शुभांगी मुणगेकर – आशा स्वयंसेविका, प्रीती जाधव – बचत गट सीआरपी
अभय सावंत – कर्मचारी, वनिता कदम – कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी वृंदाने ग्रामस्थांच्या मदतीने परिसर स्वच्छ केला.












