पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर रस्ता वाहतुकीस बंद

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पटवर्धन चौक ते टॉकीज पर्यंत पडलेले खड्डे यामुळे वाहनचालकांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांवर कॉक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यावरून वाहतूक करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, तसेच आशिये गावातील ग्रामस्थांनी देखील एक दिवस पर्यायी रस्त्यांचा अवलंब करावा, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे. मुख्य चौक ते टॉकीज या रस्त्यावर पडलेले खड्डे काँक्रीटने भरल्यानंतर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्वतः सकाळी या रस्त्यावर थांबून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, सुजित जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!