उद्योजक भाई पाताडेंकडून 1 हजार वृक्षभेट
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायत ने 1 हजार वृक्षारोपण करत पर्यावरण समृद्धीचा आदर्श घालून दिला. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर तसेच गावात 1 हजार वृक्षारोपण करण्यात आले. वड, पिंपळ, आंबा, काजू आदींसह अन्य जंगली आणि फळ उत्पादक वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे कासार्डे गावातील उद्योजक भाई पाताडे यांनी स्वखर्चाने हे 1 हजार वृक्ष ग्रामपंचायतला भेट दिले. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात कासार्डे ग्रामपंचायत च्या वतीने साजरा करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद आवारात जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, सरपंच निशा विद्याधर नकाशे, उद्योजक भाई पाताडे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. तसेच गावातील प्रत्येक ग्रामस्थांना एक वृक्ष भेट देण्यात आला. यावेळी कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, उदयोजक भाई पाताडे, पं स सदस्य अण्णा खाड्ये, तंटामुक्ती अध्यक्ष तिर्लोटकर, सर्व आशासेविका, अंगणवाडी सेवीका, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी. प्रा आरोग्य केंद्र अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.














