खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण परिसरात तसेच गावातील अन्य ठिकाणाच्या भागात पर्यावरणाला पूरक असणारी झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम खारेपाटण जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. यावेळी खारेपाटण गावचे सरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, ग्राम विकास अधिकारी विशाल वरवडेकर, खारेपाटण प्रा.आ केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर तरडे, खारेपाटण ग्रा. पं. सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, किरण कर्ले, क्षितिजा धुमाळे, कुरंगवणे माजीं उपसरपंच बबलू पवार, खारेपाटण प्रा. आ. केंद्राचे आरोग्य सहाय्यक के. एस. वानोळे व आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण लावून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने पेरू, चिकू, लिंबू, चिंच, फणस आणि जाम इत्यादी झाडे पुरविण्यात आली होती. ही सर्व झाडे खारेपाटण परिसरात लावून वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

जागतिक पर्यावरण दिना निमित्त खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे वृक्षारोपण करताना सरपंच महेंद्र गुरव, यावेळी माजी सरपंच रमाकांत राऊत, जि.प.सदस्य प्राची ईसवलकर, डॉ.प्रिया वडाम आदी उपस्थित होते.












