आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बाबासाहेबांच्या पुतळ्याला नमन करून, छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नवाज खणी दाखल करणार आज उमेदवारी अर्ज

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नवाज खणी हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवाज हे आपल्या समर्थकांसह कणकवली बुद्धविहार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर…

मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर येथे २९ ऑक्टोबर रोजी गुरुद्वादशी उत्सव!

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर येथे २९ ऑक्टोबर रोजी गुरुद्वादशी उत्सव साजरा होणार आहे. सकाळी ८.०० ते ११.०० वा. दत्तगुरूंचा पुजाविधी व अभिषेक, दुपारी १२.०० वा. महाआरती, दुपारी १.०० ते ३.00 वा. महाप्रसाद, सायं. ७.०० ते ९.०० वा.स्थानिक भजने,…

समुद्रात खलाशाने केला तांडेलचा खून

बोटीला आग लावून केले दीड कोटींचे नुकसान देवगड (प्रतिनिधी) : खोल समुद्रात मासेमारी करिता गेलेल्या नौकेवरील खलाशाने आपसात झालेल्या वादातून नौकेवरील तांडेलचा खून करून नौका पेटवल्याची घटना कुणकेश्वर पासून खोल समुद्रात १५ वाव अंतरात दुपारी २.४५ वाचण्याच्या सुमारास घडली. असून…

जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ताकद; कितीही काम केले तरी सिंधुदुर्ग वासियांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही

रणरणत्या उन्हात उपस्थित जनसागर पाहून भाजप नेते नारायण राणे झाले भावूक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी करा विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतिहास घडवा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर सभेत राणेंनी विकासाचा मांडला आलेख…

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महाराष्ट्रामध्ये जर कोणी मांडत असेल तर नितेश राणे

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे गौरवउद्गार कणकवलीत आम.नितेश राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान हा बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि मराठी मनात भरवला. आज त्या दिशेने महाराष्ट्र वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

पुढील पाच वर्षे आमदार म्हणून पुन्हा सेवा करण्याची जनतेने मला संधी द्यावी

आमदार नितेश राणे यांचे जनतेसमोर विनम्र आवाहन गेली दहा वर्ष, प्रत्येक दिवस आणि दिवसाचे 24 तास जनसेवा केली महायुतीचे सरकार येताच आठ वर्षाचा विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला कणकवली (प्रतिनिधी) :कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघातील माझ्या जनतेची सेवा गेली दहा…

नितेश राणे, निलेश राणे, दीपक केसरकर यांना निवडून देऊन सिंधुदुर्ग महायुतीचा अभेद्य किल्ला आहे दाखवून द्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा महायुतीचा अभ्यद्य किल्ला आहे. हे महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी कणकवली मतदारसंघातून नितेश राणे, कुडाळ मतदार संघातून निलेश राणे, आणि सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर…

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे च्या आरफात चौगुले या विद्यार्थ्याची राज्य स्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील आदर्श एज्यूकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचा विध्यार्थी कु.आरफात हाफिज चौगुले याने नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा…

खारेपाटण महाविद्यालयाच्या वतीने “दिवाळी विथ माय भारत” निहाय स्वच्छता जनजागृती व स्वच्छता उपक्रमाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून खारेपाटण येथे स्वच्छता जनजागृती रॅली आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छ्ता अशा उपक्रमांचे आयोजन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने नुकतेच करण्यात आले होते. भारत सरकारचे युवा व्यवहार आणि…

घराणेशाही आणि हुकूमशाही रोखण्यासाठी आम्हाला संधी द्या

संदेश पारकर यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रस्थापित व घराणेशाहीच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने एक सक्षम पर्याय आम्ही उभा केला आहे. या सरकारमध्ये सर्वसामान्यांच्या प्रती संवेदना राहिलेली नाही. या मतदार संघांचे आमदार हे फक्त स्वतःच्या फायदयाचे राजकारण करीत आहेत. त्यांना जनतेच्या…

error: Content is protected !!