घराणेशाही आणि हुकूमशाही रोखण्यासाठी आम्हाला संधी द्या

संदेश पारकर यांचे आवाहन

वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रस्थापित व घराणेशाहीच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने एक सक्षम पर्याय आम्ही उभा केला आहे. या सरकारमध्ये सर्वसामान्यांच्या प्रती संवेदना राहिलेली नाही. या मतदार संघांचे आमदार हे फक्त स्वतःच्या फायदयाचे राजकारण करीत आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नाशी देणेघेणे राहिले नाही. लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे त्यांची वाटचाल सुरु आहे. यांना रोखण्यासाठी आम्हांला एक संधी दयावी. असे आवाहन उबाठा सेना,  महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार संदेश पारकर यांनी केले आहे.
   
पत्रकार परिषदेत त्यांनी महायुती सरकार व आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, नगरसेवक रणजित तावडे, मनोज सावंत, दिप्तेश कडू, गणेश पवार, गुलझार काझी, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पारकर पुढे म्हणाले, वैभववाडी तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेले वर्षभर करूळ घाट बंद आहे. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील प्रवाशी, पर्यटक, व्यापारी, यांच्यासह शेतकरी अडचणी आले आहेत. रिक्षा, टेम्पो, ट्रक व्यवसायिक अडचणी आली आहेत.अनेक हॉटेल बंद झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. तालुक्यातील वैभववाडी उंबर्डे, भुईबावडा मार्गाची दूरस्वस्था झाली आहे.

वैभववाडी शहरातील होणारी कामे ही निकृष्ट दर्जाची होत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. शहरात शौचालाय, गटार, पाणी प्रश्न सोडवण्यात हे अपयशी ठरले आहेत. फक्त निवडणुका जिकूंन नगरपंच्यायातीवर सत्ता मिळवली जाते. मात्र विकासासाकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप पारकर यांनी केला. वैभववाडी पंचायत समितीची नवीन इमारत, येथील महाराणा प्रतापसिह कलादालांनाची दुरावस्था झाली आहे. मात्र याकडे लक्ष दयायला वेळ नाही.

आमदार नितेश राणे हे हिंदू मुस्लिम समजामध्ये तेढ निर्माण करीत आहेत. मात्र या जिल्ह्यात सर्व जाती धर्माचे लोक गुणांगोविंदाणे नांदत आहेत. त्यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करीत आहेत. त्यांना मुस्लिम समाज त्यांची जागा दाखवून देईल. असा इशारा त्यांनी दिला.या सरकारने मराठा, ओ बी सि, मुस्लिम, धनगर कोणत्याच समाजासाठी काम केले नाही. त्यामुळे सर्वच समाज घटक यांच्यावर नाराज आहेत. त्यांची नाराजी ही मतदानातून दिसून येईल असे. पारकर यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 35 वर्षे राणे शाहीची, घराणेशाही सुरु आहे. या 35 वर्षात त्यांनी काय केले हे त्यांना विचारले पाहिजे. त्यामुळे  यावेळी मतदार संघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पारकर यांनी व्यक्त केला. या मतदार संघात मतांचे विभाजन होण्यासाठी मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा करण्यात आला आहे. मात्र येथील मुस्लिम समाज हे ओळखून आहे. त्यामुळे त्यांचा हा डाव चालणार नाही. असेही पारकर म्हणाले

error: Content is protected !!