जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी ताकद; कितीही काम केले तरी सिंधुदुर्ग वासियांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही

रणरणत्या उन्हात उपस्थित जनसागर पाहून भाजप नेते नारायण राणे झाले भावूक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी करा

विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतिहास घडवा

महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर सभेत राणेंनी विकासाचा मांडला आलेख

कणकवली (प्रतिनिधी) : तुम्ही जनतेने येवढ्या मोठ्या संख्येने कुडाळ येथे निलेश राणे, कणकवली येथे नितेश राणे यांचे उमेदवारी अर्ज भरलात. रणरणत्या उन्हात येवढ्या मोठ्या संख्येने आलात.तुमचे हे प्रेम पाहून मी भारावून गेलेलो आहे.सिंधुदुर्गातील जनता अबालवृद्ध माझ्यावर जे प्रेम करतात ते पाहून खरंच मी भावूक होतो. माझ्या या आयुष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे मी कितीही काम केले तरी त्यांचे उपकार फेडू शकत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. कारण माझ्यामागे तुमचे आशीर्वाद आहेत.तुमचे प्रेम आहे. मला जशी प्रत्येक निवडणुकीत साथ दिली तशीच या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून आणून आशीर्वाद द्या. आणि विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतिहास घडवा असे आवाहन भाजप नेते माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

कणकवली येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर,माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी ,उपाध्यक्ष अतुल काळसेकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, महिला आघाडी अध्यक्षा श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला आघाडीप्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मनोज रावराणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री ,माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष आरीफ बगदादी,देवगड तालुकाध्यक्ष राजू शेटये,बंड्या नारकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, दिलीप रावराणे, जयेंद्र रावराणे अंकुश जाधव,भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव आदी उपस्थित होते.भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप नेते नारायण राणे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकांनी काय केलं ते सांगाव , रस्ते ,पुल ,नळयोजना, पाटबंधारे सिंचन प्रकल्प ही सर्व कामे मी केली आहेत. थोडा राहिलेला बॅकलॉक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पूर्ण केला.कणकवली विधानसभा मतदार मतदारसंघात विरोधकांना कोण उमेदवार भेटला नाही. म्हणून पारकर ला उमेदवारी दिली आहे. काही दिवस आमच्या सोबत होता, त्याला महांडळ दिलं. मात्र तो प्रामाणिक राहिला नाही. त्यामुळ नितेश राणे आणि कार्यकर्त्यांनी त्याचे डीपॉजित जप्त करावे. कुडाळचा आमदार हा फक्त आकाराने वाढला आहे. त्याची कोल्हापूरच्या ठेकेदारसोबत पार्टनशिप आहे.त्याने माझ्यावर टीका करण्यापलीकडे काय काम केले ते दाखवावे असा घणाघात माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री , खा. नारायण राणे यांनी केला.
आमच्याकडे पारकरला नितेश राणे यांनी आणला होता. पारकर हे जास्त गोव्यात असतात. पारकर यांनी काय केलं? नगरपंचायत मध्ये काय विकास केला ? तो दाखवा. कुडाळ – मालवण मध्ये निलेश राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याठिकाणी असलेले आमदार नाईक हे ठेकेदार आहेत,निष्ठावान आणि वैभव नाईक हे समीकरण कसे जुळेल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वैभव नाईक आणि परशुराम उपरकर कायम कामे घेवून बसलेले मला दिसत होते . एकनाथ शिंदे यांनी मला विचारले यांना पक्षात घेवू काय ? त्यांना म्हणालो घेवून काय फायदा,नुसते वजन असून काय उपयोग? वैभव नाईक चे काम काय ते सांगा. त्यांनी मच्छिमारांसाठी काय केले ? मच्छिमारांना यांनी काय दिले? आता परत फॉर्म भरला आहे. आमच्या विरोधात कोण चांगले उमेदवार विरोधकांना दिसले नाहीत. असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

तेली,उपरकर यांचा राणेंनी घेतला समाचार

भाजप नेते नारायण राणे यांनी राजन तेली परशुराम उपरकर यांनाचा चांगलाच समाचार घेतला जनाची नाही तर मनाची तरी लाज बाग माझ्यावर टीका करतात. अरे तुम्हाला राहायला खायला आणि कपडे घालायला मी शिकवले कसे राहायचे हे तुम्हाला शिकवले ते आता माझ्यावर टीका करता हा राजन दिली मुंबई बीकेसी मध्ये ज्या फ्लॅटमध्ये राहतो त्याला विचारा चार कोटीचा फ्लॅट मी घेऊन दिला सतीश सावंतला सुद्धा तेथे चार कोटीचा फ्लॅट घेऊन दिला. उपरकर माझ्यासोबत होता त्यावेळी दुसऱ्याच्या घरात राहत होता त्याला मी स्वतःचे घर बांधायला लावले या लोकांनी माझ्यावर टीका करावी आणि ती मी ऐकून घ्यावी असे होणार नाही मी टीका टीकेचा हिशोब नियमित चुकता करतो कारण मी कोणाच्या बसण्या उठण्यात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी केलेले काम बोलत आहे तुम्ही एक बालवाडी उभी केली असेल तर दाखवा असा शब्द खरपूस समाजात उबाठा शिवसेनेत गेलेल्या नेत्यांचा घेतला.

error: Content is protected !!