कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नवाज खणी हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवाज हे आपल्या समर्थकांसह कणकवली बुद्धविहार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून महामानवांचे आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर कणकवली तहसीलदार कार्यालयात जात आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नवाज खणी यांनी अल्पसंख्याक बांधवांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे जाहीर केले होते.अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर करताना नवाज यांनी आमदार नितेश राणे यांच्या मुस्लिम विरोधी भूमिकेला लक्ष्य केले होते.