Category कुडाळ

नेरूर येथील श्री.कलेश्वर विद्यामंदिर हायस्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर येथील श्री.कलेश्वर विद्यामंदिर हायस्कुल व प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी संस्था…

कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार- वैभव नाईक

तेंडोली, नेरूर, पिंगुळी विभागातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी मा.आ.वैभव नाईक यांच्याकडून संवाद कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील तेंडोली, नेरूर,पिंगुळी या जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी काल मंगळवारी भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे…

आंब्रड, कसाल, पावशी विभागात मा. आ. वैभव नाईक यांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

कुडाळ (प्रतिनिधी) : माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी कुडाळ तालुक्यातील आंब्रड, कसाल, पावशी या जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. शेवटचा नागरिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करण्याची भूमिका यावेळी त्यांनी…

७३ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मतदारसंघात काम करत राहणार- वैभव नाईक

कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक कुडाळ (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत माझ्या झालेल्या पराभवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील जनता हळहळ व्यक्त करत आहे. महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर…

लघु पाटबंधारे आंबडपाल विभागात संविधान दिन साजरा

अभियंता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली संविधान पळण्याची शपथ कुडाळ (प्रतिनिधी) : भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी…

राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी समरस असणाऱ्यांनाच सहकार्य करणार – मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब

कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मिता, स्थानिकांनाच रोजगार आणि विकासा सोबत प्राधान्याने हिंदुत्ववाद हाच मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. सध्या निवडणुकीत जातीय मुद्दे तसेच काही मुस्लिम संघटनांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना मोकाट सोडणे व…

कुडाळ मध्ये आमदार वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत, लोकप्रिय, निष्ठावंत उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन शनिवारी कुडाळ येथील शिवसेना शाखा येथे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. कुडाळ शिवसेना…

भाऊबीजेदिवशीच बहिणीवर काळाचा घाला

दुचाकी अपघातात सायली आकेरकर यांचे निधन कुडाळ (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेच्या माजी कमर्शियल क्लार्क आणि कुडाळ कविलकट्टा येथील रहिवासी सायली शरद आकेरकर (वय 60) यांचे रविवारी रात्री उशिरा कविलकट्टा येथून कुडाळ येथे जात असताना अपघात होऊन निधन झाले. आकेरकर या…

उबाठात प्रवेश करणारे चिंतामणी मडव हे मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांचा आमचा संबंध नाही

शिंदे गटाचे आंब्रड विभागीय अध्यक्ष गुणवंत सावंत यांची जांभवडे प्रवेशावर प्रतिक्रिया कुडाळ (प्रतिनिधी) : जांभवडे गावातून काल ज्या एकमेव व्यक्तीचा प्रवेश घेत वैभव नाईक यांनी निलेश राणेंवर टीका करायला लावली त्या चिंतामनी मडव व शिंदे शिवसेनेचा काहीही संबंध नसून ते…

मांडकुली गावामध्ये उबाठा शिवसेनेला भगदाड

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे माजी उपसरपंच व शाखाप्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला प्रवेश कुडाळ (प्रतिनिधी) : मांडकुली येथील उबाठा शिवसेनेचे माजी उपसरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या…

error: Content is protected !!