राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी समरस असणाऱ्यांनाच सहकार्य करणार – मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब

कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मिता, स्थानिकांनाच रोजगार आणि विकासा सोबत प्राधान्याने हिंदुत्ववाद हाच मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. सध्या निवडणुकीत जातीय मुद्दे तसेच काही मुस्लिम संघटनांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना मोकाट सोडणे व वक्फ बोर्ड जमिन सारख्या विषयांना बळ देणे यासारख्या मागण्या मान्य करून त्यांना समर्थन देणाऱ्यांना मनसेचा कायम विरोधच असणार आहे. आणि म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना शाश्वत रोजगार व पर्यटन विकासाला चालना, ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेला सक्षम करणारा आणि सोबत हिंदुत्वाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारास सहकार्य करण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहे.

error: Content is protected !!