शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील सामजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांच्या माध्यमातून जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथील शालेय विद्यार्थ्याना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवसेना माजी जिल्हाप्रमुख श्री सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला शिवसेना कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले,उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर,खारेपाटण शिवसेना विभाग प्रमुख शिवाजी राऊत, युवासेना उपतालुका प्रमुख तेजस राऊत,श्रीम.नंदिनी पराडकर,श्री चेतन राऊत,नितेश राऊत,रोहन गुरव,योगेश गुरव,सुजित गुरव,सुमित गुरव,प्रथमेश गुरव,विशाल गुरव,विक्रांत गुरव आदी शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खारेपाटण जि.प.केंद्रशाळा नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी,समिती सदस्या सौ.समृध्दी लोकरे यांच्या शुभभस्ते उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांचे व शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांचे खारेपाटण केंद्र शाळेच्या सर्व विद्यार्थ्याना मोफत छत्री वाटप केल्याबद्दल या उपक्रमाचे स्वागत करून शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख यांनी “आता मान्सून सक्रिय झाला असून जो पर्यंत पाऊस पडत नाही.तोपर्यंत विद्यार्थ्याना नवीन वर्षात शाळेत गेल्यासारखे वाटत नाही.परंतु या पावसा पासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी जवळ छत्री असणे आवश्यक आहे.आणि विद्यार्थ्यांची ही खरी गरज ओळखून आमचे खारेपाटण चे कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांनी आपल्या सामाजिक दायित्वातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्याचे चांगले कार्य हाती घेतले आहे.या उपक्रमाला व खारेपाटण केंद्र शाळेच्या दिवसेंदिवस होत असलेल्या भरभराटीला व प्रगतीला मी शुभेच्छा देतो.असे भावपूर्ण उदगार विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना काढले.”