धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला कैदेसह दंडाची शिक्षा

कणकवली (प्रतिनिधी) : आपले नातेवाईक कळसुली बौद्धवाडी येथील संजय शांताराम तांबे यांच्याकडून हातऊसने घेतलेल्या ३ लाख रुपयांच्या परतफेडीपोटी दिलेला धनादेश न वठल्याने कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील सुनील कमलाकर तांबे याला येथील सह प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी सहा महिन्याची कैद आणि ३ लाख रुपये व त्यावर फिर्याद दाखल केल्यातारखेपासून व्याज देण्याचा आदेश दिला. दोन महिन्यात रक्कम न भरल्यास पुन्हा सहा महिन्याची अतिरीक्त कैदही सुनावली आहे. फिर्यादी संजय तांब याच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

फिर्यादी संजय तांबे व आरोपी सुनील तांबे हे नातेसंबंधातून एकमेकांना ओळखत होते. एप्रिल २०१६ मध्ये आरोपीने चुलत भावच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी ३ लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीने आपली मुदत ठेव मोडून ती रक्कम त्याला एक महिन्यासाठी हात उसने दिले. त्याच्या परताव्याकरीता आरोपीने अभ्युदय बँकेचा ३ लाख रुपये रक्कमेचा चेक फिर्यादीला दिला होता. तो चेक न वठल्याने फिर्यादीने त्याला मुदतीत नोटीस दिली व त्यानंतर येथील न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. सुनावणीदरम्यान कायदेशिर देणे असल्याचे पुराव्याने शाबीत झाले. त्यामुळे आरोपीला दोषी धरून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!