विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर

रविवार 28 जानेवारी रोजी कुडाळ पोस्ट ऑफिसमसोर, माधवबागच्या शेजारी होणार रुग्ण तपासणी

मोतीबिंदू ऑपरेशन साठी घसघशीत सूट असलेली खास ऑफर

कुडाळ (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर ( कुडाळ ओपीडी ) च्या वतीने मोफत नेत्र आणि मोतीबिंदू तपासणी शिबीर रविवार 28 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान कुडाळ पोस्ट ऑफिससमोर, माधवबाग च्या शेजारी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व निदान, डोळ्यांची पडद्याची तपासणी, डोळ्यांचा कोरडेपणा, काचबिंदू निदान व तपासणी, चष्म्याचा अचूक नंबर, दृष्टीक्षमता व नजर तपासणी मोफत केली जाणार आहे.

नेत्र तपासणी पुढील त्रास असणाऱ्या व्यक्तींनी करणे गरजेचे असते – ज्यांना मधुमेह आहे अशी व्यक्ती, सतत मोबाईल व कॉम्प्युटर हाताळणाऱ्या व्यक्ती, वय वर्ष ४० वरील प्रत्येक व्यक्ती, तिरळे डोळे असलेली मुले, धुरकट व अंधूक दिसत असल्यास, मोतिबिंदूची शंका असणारी व्यक्तीनी नेत्र तपासणी करणे अत्यावश्यक आहे. मोतीबिंदू साठी विनाटाका शस्त्रक्रिया केली जाते. यात लहान छेद घेऊन ऑपरेशन करतात.विनाटाका ऑपरेशन मध्ये साधारण १ महिना काळजी घ्यावी लागते.ऑपरेशन नंतर जवळचा लांबचा दोन्ही चष्म्याचा नंबर लागतो. मोतीबिंदू ऑपरेशन ची दुसरी पद्धत असते Phaco (फेको) ऑपरेशन. यात जखम कमी प्रमाणात असते.दोन दिवसात जखम भरणार.८ दिवसात दैनंदिन काम करु शकतो.घडीची लेन्स (foldable), मशिनद्वारे शस्त्रक्रिया विना इंजेक्शन विना टाका होते. मोतीबिंदू ऑपरेशन साठी खास ऑफर देण्यात आल्या असून 6 हजारांची शस्त्रक्रिया फक्त 3 हजार 999 रुपयांमध्ये आणि 11 हजारांची शस्त्रक्रिया फक्त 7 हजार 999 रुपयांमध्ये केली जाणार आहे. तसेच 15 हजार ते 1 लाख पर्यंत च्या लेन्स वर 10 टक्के सूट मिळणार आहे. यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून मोबा-9850849315 अथवा मोबा- 8408803536 वर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!