10 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवाशाला केली परत

रिक्षाचालक निलेश म्हसकर यांचा प्रामाणिकपणा

कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे येथील दीपिका पावसकर या कणकवली एलआयसी ऑफिस ते दीपक बेलवलकर यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक दागिने असलेली बॅग होती. रिक्षातून प्रवास करतेवेळी सदर बॅग ही पावसकर या रिक्षामध्येच विसरल्या होत्या. दरम्यान दागिने असलेली बॅग हरवली असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. तसेच कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपली बॅग हरवली असल्याचे व त्यापैकी दागिने असल्याची पोलिसांना कल्पना दिली. दरम्यान पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या बॅगेत २ सोन्याच्या बांगड्या, २ कानातले व इतर अस मिळून १० तोळे चे सोने होते.

पोलीस उपनिरीक्षक ह हाडळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ येथील टेक्निशियन योगेश नार्वेकर यांच्या मदतीने व cctv च्या माध्यमातून पावसकर यांनी प्रवास केलेल्या रिक्षाचा शोध घेण्यात आला. तत्पूर्वी बॅग मिळताच रिक्षा चालक निलेश म्हसकर यांनी सदर घटनेची कल्पना अण्णा कोदे यांना दिली व अण्णा कोदे यांच्या माध्यमातून सदर बॅग कणकवली पोलीस ठाण्यात जमा केली त्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती संबंधित दागिन्याच्या बॅग मालकांना देण्यात आली व बॅग दीपिका पावसकर यांच्या ताब्यात देण्यात आली.

यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे यांच्या उपस्थितीत सदर दागिने असलेली बॅग दिपिका पावसकर यांना सुपूर्द करण्यात आली.

दरम्यान रिक्षा चालक निलेश म्हसकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी कणकवलीतील सर्वच रिक्षा चालक हे प्रामाणिक असल्याचे बोलले जात असून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!