कणकवली महामार्गावर हुंबरट येथे डंपर पलटी होऊन अपघात

अपघातात दोघेजण जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : तळेरेहुन कणकवलीच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा डंपर  हुंबरट ब्रिजवर पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात दुपारी 4 च्या सुमारास झाला. अपघातात ड्रायव्हर आणि त्यासोबत 12 वर्षाचा मुलगा देखील किरकोळ जखमी झाला आहे. ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.  ट्रकमधील चिऱ्याची माती महामार्गावर पसरली असल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती समजतात महामार्ग पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत  वाहतूक सुरळीत केली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल दत्ता कांबळे दिलीप पाटील व चिंदरकर उपस्थित होते

error: Content is protected !!