दुर्घटनाग्रस्तांना दिला दिलासा
कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील पटवर्धन चौक येथे असलेल्या आर.बी. बेकरी, राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडीकलला शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता सुमारास लागलेल्या भीषण आगीत सर्व दुकाने बेचिराख झाली. या घटनेची माहिती मिळतात कणकवली भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकान मालकांची विचारपूस करत घाबरून जाऊ नका, मी आपल्या पाठीशी आहे. आपण सर्वतोपरी लागणारी मदत करु, पुढील काळात अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाईल, असे आश्वासन आ. नितेश राणे यांनी दिले. यावेळी कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राजू गवाणकर, बेकरी मालक, बेर्डे मेडीकलचे मालक, राजा पाटकर, जावेद शेख, अनिल पवार लवराज झेमने, विराज भोसले, अजय गांगण, अभय राणे, इम्रान शेख आदींसह कणकवली शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार नितेश राणे म्हणाले, ऐन दिवाळीच्या काळात या दुकानांना पावसामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात दुकानदारांचे नुकसान झालेले आहे. घटनास्थळी सकाळपासून आमचे समीर नलावडे, बंडू हर्णे, अबिद नाईक आणि आम्ही सर्व लागणाऱ्या गोष्टींची मदत केली आहे. भविष्यात अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत म्हणून ज्या काय आवश्यक असलेल्या उपाययोजना त्यांनी निश्चितपणे केल्या जातील. त्या दुकानदारांची फार मोठी ऐन दिवाळीच्या काळात हानी झाली आहे, त्याचे दुख होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.