कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येत आहेत. यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज झालंय. तसंच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या खास प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत असल्याने कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केलीय. परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचीच गैरसोय केल्यानं पत्रकारांनी सभेच्या ठिकाणी खाली बसून निषेध व्यक्त केला.
तपोवन मैदानावर मोदींच्या सभेसाठी भव्य दिव्य अशी तयारी करता येवू शकते तर मग देशाच्या चौथा स्तंभाला साधी बसण्याची व्यवस्था न केल्यानं पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मोदींच्या सभेसाठी भव्य दिव्य तयारी देशाच्या चौथा स्तंभाला साधी बसण्याची व्यवस्था न केल्यानं पत्रकारांनी केली तीव्र नाराजी
