कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावडेवाडी येथील जागृत देवस्थान श्री देव लिंगेश्वर मंदिराचा सातवा वर्धापन दिन व सत्यनारायण महापुजेचे बुधवार दि. 1 मे राेजी आयाेजन करण्यात आले आहे.त्यानिमत्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न हाेणार आहेत.
सकाळी 6 वाजता काकड आरती, त्यानंतर 9.30 ते 11.30 वा.श्री सत्यनारायणाची महापुजा, आरती व तिर्थप्रसाद दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी 7 वा.काेटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक बुवा सुजित परब, पखवाज हर्षद राणे यांचे भजन हाेणार आहे. त्यानंतर रात्री 9 वा. 20×20 डबलबारीचा जंगी सामना ओम साईलिला प्रा भजन मंडळ भांडुप (मुंबई) बुवा चंद्रकांत जाधव, गुरुवर्य – भजन सम्राट भगवान लोकरे व रायगड भूषण कृष्णा देशमुख बुवा यांचे शिष्य, पखवाज – हेमंत तवटे तबला – साई नाईक विरुद्ध विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आजीवली-सोनारवाडी (राजापुर) बुवा प्रवीण सुतार, गुरुवर्य- सुप्रसिद्ध भजनकार अजित मुळम बुवा यांचे शिष्य,पखवाज – रितेश पांचाळ, तबला, सुदर्शन मेस्त्री यांच्यात हाेणार आहे.
वर्धापन दिन श्री सत्यनारायणाच्या पुजेनिमित्त हाेणार्या कार्यक्रमांना उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव लिंगेश्वर मित्रमंडळ कलमठ गावडेवाडीच्यावतीने करण्यात येत आहे.












