सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बैनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होडींग्ज, कमानी लावण्यास प्रतिबंध

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी) : जिल्ह्यातील निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्हिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालणे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (घख) अन्वये निवडणुकीच्या प्रचाराचे साहित्य कोणात्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 ) निर्बध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी आदेशित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!