त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही एक संधी
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना, ज्या ज्या वेळी नेतृत्वाची संधी मिळाली त्या त्या वेळी या जिल्ह्यासाठी, या कोकणसाठी या महाराष्ट्रासाठीयशस्वी नेतृत्व केले आहे. केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून ते आता देशाचे नेतृत्व करत आहेत. भारतीय जनता पक्षात केंद्र सरकारमध्ये या भागातील एक कर्तुत्ववान नेतृत्व म्हणून त्यांना आदराचे व सन्मानाचे स्थान आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग चे भाजपा उमेदवार म्हणून महायुतीकडून निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीतील सर्वच पक्षानी गावा गावातील प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून मतदाराने या नेतृत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून नारायण राणे दीड लाख मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला आहे.
गेली 30/35 वर्ष नारायण राणे यांनी आपली जन्मभूमी व आपली कर्मभूमी समजून या जिल्ह्याचे अनेक पदांवर नेतृत्व केले. एक सक्षम नेतृत्व, कोकणचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांनी मंत्री मुख्यमंत्री व आता देशाचे उद्योग मंत्री या पदावर काम करताना आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला ! हा जिल्हा टँकर मुक्त होण्यात आणि टंचाई दूर करण्यात नारायण राणे यांचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळ उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधा याकडेही त्यांनी प्राधान्य दिले, जिल्ह्यातील विमानतळ जिल्ह्यातील महामार्ग, औद्योगिक विकास क्षेत्र या कामात ही त्यांच्यात काळात चालना मिळाली. या जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधा बळकट व्हावी व या जिल्ह्यातच चांगले दर्जाचे आरोग्य सेवा मिळावी म्हणून पडवे येथे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल सुरू केले. सिंधुनगरी येथे आता नव्याने रोजगाराला चालना देणारे केंद्र सरकारच्या उद्योग विभागाचे 200 कोटी खर्च करून प्रौद्योगिक केंद्र सुरू होत आहे. हा सर्व विकास नारायण राणे यांच्या रूपाने मिळालेल्या एका कार्यक्षम नेतृत्वामुळे होत आहे. म्हणूनच आगामी काळात या जिल्ह्याला या कोकणच्या विकासाला आणखी गती मिळावी म्हणून लोकसभेमध्ये या नेतृत्वाला संधी मिळण्याची आवश्यकता आहे. वा हा विचार मतदारांनी करावा व या नेतृत्वाच्या मागे जिल्हावासीय जनतेने शक्ती निर्माण करावी असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 918 बुथवर भारतीय जनता पक्षासह महायुतीतील सर्व घटक पक्षाचे नेते व कार्यकर्ते सक्रियपणे काम करीत आहेत. शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे, आरपीआय आठवले गट या पक्षाचे कार्यकर्ते व नेते प्रचार कार्यात सक्रिय आहेत. सावंतवाडी कुडाळ व कणकवली या तिन्ही विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या बाजूने उत्साहाचे वातावरण आहे. या भागात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या ऋणातून उतराई हॊण्याची ही एक संधी आहे असे मतही काही मतदार व्यक्त करीत आहेत. केंद्रात नारायण राणे व राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत अशा या जिल्ह्यातील नेतृत्वांमुळे व सत्तेतील संधीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला दमदार नेतृत्व मिळाले आहे. अशा दमदार नेतृत्वामुळे कोकणामध्ये अनेक विकास कामे आता दिसू लागली आहेत. त्यामुळे विकासासाठी या सर्वच नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.