स्टार इलेव्हन चिंदर आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा !
आचरा (प्रतिनिधी) : स्टार इलेव्हन ग्रुप चिंदर आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा श्री रामेश्वर मैदान चिंदर देऊळवाडी येथे 26 ते 28 एप्रिल दिमाखात संपन्न झाली.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी काल रविवार 28 एप्रिलला स्टार इलेव्हन चिंदर आणि राज स्पोर्ट्स या दोन संघात मध्ये पहिला सेमी फायनल सामना झाला या सामन्यात राज स्पोर्ट्स संघाने विजय प्राप्त करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसरी सेमी फायनल अथांग स्पोर्ट्स आणि ओम साई चिंदर या संघांमध्ये झाली. यामध्ये अथांग स्पोर्ट्सने विजय प्राप्त करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. स्पर्धेचा अंतिम सामना अथांग स्पोर्ट्स आणि राज स्पोर्ट्स यांच्यात झाला अतिशय रंगातदार झालेल्या सामन्यात अथांग स्पोर्ट्सने विजय प्राप्त करतi चषकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते व सिंधुदुर्ग बँकेचे संचालक बाबा परब, भाजपा सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी सरपंच संतोष कोदे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्पर्धेत अथांग स्पोर्ट्स -मनोज हडकर, राज स्पोर्ट्स -सौरभ सावंत, ओम साई चिंदर -समीर हडकर, जयंती देवी क्रिकेट संघ-अक्षय परब, संतोष स्पोर्ट्स-संतोष कोदे, स्टार इलेव्हन-संतोष गांवकर आणि दिपक सुर्वे, आदी आठ संघ स्पर्धेत सहभागी होते. संतोष गांवकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, दिगंबर जाधव, स्टार इलेव्हन अध्यक्ष संदिप परब तसेच सर्व स्टार इलेव्हन ग्रुपच्या सदस्यांनी नियोजन करून मेहनत घेतली. यावेळी संघ मालक मनोज हडकर, संघमालक सौरभ सावंत, दिगंबर जाधव व स्टार इलेव्हन ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.