लग्नाच्या बहाण्याने फसवणूक, अटकपूर्व जामीन मंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील संशयित आरोपी महेश श्रीकांत पाटकर (रा. पाट) याला ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने अॅड. प्रणिता प्रदिप कोटकर यांनी काम पाहिले.

कुडाळ तालुक्यातील एका ४२ वर्षीय व्यक्तीला लग्नाचा बहाणा करून त्याची सुमारे १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल असलेल्या या टोळीपैकी संशयित आरोपी संतोष काकडे (वय ३७, रा. शिरोली, ता. करविर, जि कोल्हापूर), संतोष जगदाळे (वय ४०, राहा. दहिवाडी ता. मान, जि. सातारा), विशाल थोरात (वय ३४, रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), माधुरी केदारी उर्फ भारती ठोंबरे (वय ३२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), ज्योती शेलार (वय ४३, रा. ता. वाई, जि. सातारा), मंगल महापूर (वय ४८, रा. हेर्ले हातकणंगले, जि. कोल्हापूर), ममता पगारे (वय ३७, रा. शिर्डी अहमदनगर), किरण पगारे (वय ४७, रा. शिर्डी अहमदनगर), प्रमुख संशयित रुपाली पाटील (वय ३५, रा. शिर्डी अहमदनगर) यांना अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर, सातारा येथून ताब्यात घेत अटक करून यापूर्वी पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी होऊन जामीन मंजूर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!