प्रत्येक विद्यार्थ्याने आपले वेगळेपण जपले पाहिजे..! ; जयेंद्र रावराणे

वैभववाडीत एस.एस.सी मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे आज एस. एस. सी मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ‘प्रत्येक विद्यार्थ्याने आपले वेगळेपण जपले पाहिजे;आपल्या उच्च शिक्षणासाठी आपल्या पालकांना आर्थिक खर्च करायला लागणार नाही असे उज्वल यश आपण संपादन करावे, तालुक्यासह जिल्ह्यात प्रथम द्वितीय तृतीय व अन्य क्रमांकही मिळवावे..!’ अशी अपेक्षा संस्था अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या कार्यक्रम प्रसंगी सानिका गुरव, अंकिता लसणे, सिद्धी सावंत, दिपराज झोरे, दुर्वांक चव्हाण, साक्षी भोसले, प्रिया बोडेकर, वेदांत पाटील यांनी गत शैक्षणिक काळातील आपले अध्ययन अनुभव कथन केले व चांगल्या गुणांनी आम्ही सर्वजण उत्तीर्ण होऊ असे अभिवचन उपस्थित शिक्षक वर्गाला दिले. ‘विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास त्यांना यशाकडे घेऊन जाणार आहे असे मत क्रिडा शिक्षक संदेश तुळसणकर यांनी व्यक्त केले. यानंतर प्रशालेच्या पी.एन. भोवड, ए.एस.परीट, वाय.जी.चव्हाण, आर.एम. फुटक या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.साक्षी भोसले हिने केले तर प्रास्ताविक एस.बी.शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन पी.पी.सावंत यांनी केले. या कार्यक्रमाला संस्था अधिक्षक जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील, दहावीचे वर्ग शिक्षक एस.बी.शिंदे, एस.व्ही.भोसले, तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख वाय.जी.चव्हाण, एम.एस.चोरगे., व शिक्षक पी.बी.पवार, ए.जी.केळकर, एस.ए.सबनीस, ग्रंथपाल आर.जे.पवार, पी.पी.साखरपेकर आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!